उल्हास नदीच्या दरीत एक दिवसाची भटकंती "द युथ हायकार्स" सोबत
नदीचे मूळ आणि ऋषीचे कूल शोधू नये असे पूर्वीचे लोक सांगत असत; ऋषीचे कूल नाही पण नदीचे मूळ शोधायला काही लोक जातातच-जातात, आम्हीही त्यातलेच आहोत. उल्हास नदीच्या दरीत आम्ही बऱ्याचदा उतरलो आहोत. खंडाळ्याच्या एका दिशेला दरीच्या उजव्या बाजुने उतरून, पुढे मग दुसऱ्या बाजुने चढलो आहोत तर कधी तसेच कधी पुढे खोऱ्यात लांबवर चालत कधी ठाकूरवाडी कधी राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या "कुरवंडे" गावापर्यंत गेलो आहोत तर कधी पार नदीची तीच धार पकडून पार "कर्जत" पर्यंत सुद्धा गेलो अहोत. हा ट्रेक कमीतकमी वेळात व एका दिवसात सहभागार्थिना सोबत घेऊन करायचा असल्यास दरीच्या उजव्या बाजुने उतरून, पुढे मग दुसऱ्या बाजुने चढणे हाच योग्य मार्ग आहे. बाकी इतर मार्गांनी करायचा असल्यास एक दिवस कमी पडतो.
उल्हास नदीची दरी आणि मागे दिसणारा नागफणीचा सुळका
काही दिवसांपुर्वी आम्ही हा ट्रेक "द युथ हिकेर्स"च्या पूर्वायोजित क्रमानुसार घेऊन गेलो होतो.
आधीच ठरल्या प्रमाणे आम्ही सर्व मुंबई येथून सकाळी सुटणारी "इंद्रायणी ट्रेन" पकडून "लोणावळा" येथे सकाळी ८.०० च्या सुमारास भेटलो. काही जण पुण्याहून तेथेच भेटले.
लोकांची उपस्थितीचा हिशेब आटपून आमच्या पुढच्या टप्प्याकडे म्हणजे "सकाळच्या न्याहारी" करिता आमच्या नेहमीच्या "अन्नपूर्णा" हॉटेल कडे निघालो. पुण्याकडून आधीच तेथे आलेले अजून दोन जण आम्हाला तेथे भेटले. आम्ही सर्वजण मिळून २४ होतो. पोटभर न्याहारी आटपून आम्ही रिक्षा वगैरे साधनाने खंडाळ्याच्या "समर हिल" सोसायटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवेशद्वारा पाशी उतरलो
समर हिल सोसायटीचे प्रवेशद्वार
व खऱ्या अर्थाने ट्रेकला सुरूवर झाली. काही अंतर चालून गेल्यावर नियोजित ठिकाणी आम्ही ओळख परेड केली.
"ओळख परेड"
याच रस्त्याने पुढे जाऊन डावीकडे असलेल्या "खासगी मालमत्ताअसलेल्या" एका रस्त्याकडे वळावे थोडेसे पुढे चढून लगेच उजवीकडे पठाराच्या दिशेला वळावे.
वाटेवरची पायपीट
हिच वाट १०-१५ मिनिटे चालत गेल्यावर एका अशाठिकाणी घेऊन येते जेथे एक पाण्याच्या ओहोळाचा मार्ग लागतो (सारखे दिसणारे काही मार्ग आहेत त्यामुळे पावसाळ्याच्या व त्या नंतरच्या काही दिवसात दाट रान-झाडी उगवल्यामुळे अचूक मार्ग शोधावा लागतो).
ओहोळाचा मार्गाकडे जाणारी छोटीशी पायवाट
याच ओहोळाच्या मार्गत उतरावे. सोबत असलेले बहुसंख्य सहयोगींचा हा पहिलाच ट्रेक असलेल्या मुळे या मार्गाने उतरताना प्रत्येकाची निट काळजी घ्यावी लागत होती.
हे असं कसरत करीत उतराव लागत
उतरताना लागणारा एक छोटासा अडथळा
हाच ओहोळाच्या मार्ग पुढे धबदब्याच्या रुपात दरीमध्ये कोसळतो. येथे डावीकडुन एक छोटी वाट खाली उतरते. त्या वाटेने खाली तळाला उतरलो.
डावीकडून वाहत्या पाण्याच्या उलट्या दिशेने चालल्यावर १०-१५ मिनिटात आम्ही उल्हास नदीच्या मोठ्या धबदब्यापाशी पोचलो. येथूनच पुढे ही नदी पुढे कर्जत-नेरळ-बदलापूर-उल्हासनगर-भिवंडी असा प्रवास करत पुढे वसईजवळ सागराला मिळते.
दिवस उन्हाळयाचे होते त्यामुळे आमच्यातील जवळ जवळ सर्वच जण वाहत्या पाण्याखाली मनसोक्त भिजले.
नदीवरचा मुख्य धबधबा
किरण कुमार, काजल सोनी, वैभव, कांचन आणि कृतिका मनसोक्त भिजताना
काजल सोनी, वैभव, कांचन, कृतिका, रितेश, मीनाक्षी, वैभव सरोदे आणि विशाल
मग सपाटून भूक लागली, जेवणाचे डबे खोलले व त्यावर ताव मारला. जवळच असणाऱ्या एका झऱ्याचे पाणी पिण्याकरिता बाटल्यांमध्ये भरून घेतले. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. येथे एका ठिकाणी नदी एका अतिशय चिंचोळ्या जागेमधून वाहते तेथे खाली उतरून पलीकडल्या बाजूला जावे लागते व उजव्या बाजूने अतिशय लहान असलेल्या वाटेने मार्गक्रमण करावे लागते.
येथून नदीच्या पलीकडल्या दिशेला जाताना थोडी काळजी घ्यावी
(पावसाळ्यानंतरच्या काही दिवसात येथे फार काळजी घ्यावी). आमच्यातील उमेश ठाकूर, विशाल म्हस्के, प्रतिक म्हात्रे सर्वांची नीट काळजी घेत होते. काहीना तर आम्ही चक्क हाताला धरून पलीकडल्या बाजूला घेऊन गेलो. येथे नदीच्या पत्रामधूनच पुढे चालत जावे लागते.
येथे नदीच्या पत्रामधूनच पुढे चालत जावे
पुढे नदीच्या पात्रामधून चालत जाऊन काही वेळात डावीकडल्या वर खंडाळ्याच्या "कामत रिसॉर्ट" कडे वर चढणारी वाट पकडली.
या वाटेत २ ठिकाणी लागणाऱ्या सोप्या श्रेणीच्या चढाया करून आम्ही सर्व संध्याकाळी ठीक ६.३० पर्यंत वर चढून आलो. जवळच वाटेमध्ये एके ठिकाणी असलेल्या सरबताच्या गाडीवर मन भेरेस्तोवर सरबत, गोळा, दुध-कोल्ड्रिंक वगैरे पिऊन शुधा पुर्ण केली. तेथून पुढे रिक्षा धरून लोणावळ्यामार्गे मुंबई-पुण्याच्या दिशेने आपापल्या घरी परतलो.
"द युथ हायकार्स" करिता छायाचित्रीकरणाची जवाबदारी पार पडल्याबद्दल विशेष आभार : रितेश देसाई
मोहिमे मध्ये नेहमीप्रमाणे अथक परिश्रम घेणारे माझे स्नेही : उमेश ठाकूर आणि विशाल मस्के. ट्रेकमध्ये सहभागार्थी असून "द युथ हायकार्स" करिती मनापासून परिश्रम घेणारया मयुरेश हिंगे आणि प्रतिक म्हात्रेचा सुद्धा मी मनापासून आभारी आहे.
तसेच आल्विन, अविष्कार अगरवाल, काजल सोनी, कांचनमाला सिंग, किरण कुमार, कृतिका गंगाधरन, मनिष गोरी, मिनाक्षी चंचलानी, संतोष विपत, विशाखा अगरवाल, स्नेहिल वास, विपुल आहाळे, आनंद पोद्दार, वैभव ढवळे, वैभव सरोदे, शरद गोपट, फक्त १५ वर्षांचा प्रसुक इतर सहभागार्थी मी मनापासून आभारी आहे.
मी, उमेश ठाकूर, प्रतिक म्हात्रे आणि मयुरेश हिंगे
छायाचित्रकार - रितेश देसाई
अधिक छायाचीत्रांकारिता करिती फेसबुक लिंक -
https://www.facebook.com/riteshd1/media_set?set=a.886808808011895.100000483531944&type=3
आपला ऋणी
द युथ हायकार्स

विशाखा अगरवाल, अवि, वैभव, संतोष, मनीष गोरी आणि कांचन
काजल, प्रसुक, विपुल, आल्विन, संतोष, अविष्कार,