Monday 12 May 2014

उल्हास नदीच्या दरीत एक दिवसाची भटकंती "द युथ हायकार्स" सोबत

उल्हास नदीच्या दरीत एक दिवसाची भटकंती "द युथ हायकार्स" सोबत 


नदीचे मूळ  आणि ऋषीचे कूल शोधू नये असे पूर्वीचे लोक सांगत असत; ऋषीचे कूल नाही पण नदीचे मूळ शोधायला काही लोक जातातच-जातात, आम्हीही त्यातलेच आहोत. उल्हास नदीच्या दरीत आम्ही बऱ्याचदा उतरलो आहोत. खंडाळ्याच्या एका दिशेला दरीच्या उजव्या बाजुने उतरून, पुढे मग दुसऱ्या बाजुने चढलो आहोत तर कधी तसेच कधी पुढे खोऱ्यात लांबवर चालत कधी ठाकूरवाडी कधी राजमाची किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या "कुरवंडे" गावापर्यंत गेलो आहोत तर कधी पार नदीची तीच धार पकडून पार "कर्जत" पर्यंत सुद्धा गेलो अहोत. हा ट्रेक कमीतकमी वेळात व एका दिवसात सहभागार्थिना सोबत घेऊन करायचा असल्यास दरीच्या उजव्या बाजुने उतरून, पुढे मग दुसऱ्या बाजुने चढणे हाच योग्य मार्ग आहे. बाकी इतर मार्गांनी करायचा असल्यास एक दिवस कमी पडतो. 



                                     उल्हास नदीची दरी आणि मागे दिसणारा नागफणीचा सुळका 

काही दिवसांपुर्वी आम्ही हा ट्रेक "द युथ हिकेर्स"च्या पूर्वायोजित क्रमानुसार घेऊन गेलो होतो. 
आधीच ठरल्या प्रमाणे आम्ही सर्व मुंबई येथून सकाळी सुटणारी "इंद्रायणी ट्रेन" पकडून "लोणावळा" येथे सकाळी ८.०० च्या सुमारास भेटलो. काही जण पुण्याहून तेथेच भेटले. 
लोकांची उपस्थितीचा हिशेब आटपून आमच्या पुढच्या टप्प्याकडे म्हणजे "सकाळच्या न्याहारी" करिता आमच्या नेहमीच्या "अन्नपूर्णा" हॉटेल कडे निघालो. पुण्याकडून आधीच तेथे आलेले अजून दोन जण आम्हाला तेथे भेटले. आम्ही सर्वजण मिळून २४ होतो.  पोटभर न्याहारी आटपून आम्ही रिक्षा वगैरे साधनाने खंडाळ्याच्या "समर हिल" सोसायटीच्या दिशेने जाणाऱ्या प्रवेशद्वारा पाशी उतरलो 



                                                         समर हिल सोसायटीचे प्रवेशद्वार

व  खऱ्या अर्थाने ट्रेकला सुरूवर झाली. काही अंतर चालून गेल्यावर नियोजित ठिकाणी आम्ही ओळख परेड केली. 



                                                                 "ओळख परेड"

याच रस्त्याने पुढे जाऊन डावीकडे असलेल्या "खासगी मालमत्ताअसलेल्या" एका रस्त्याकडे वळावे थोडेसे पुढे चढून लगेच उजवीकडे पठाराच्या दिशेला वळावे. 



                                                                   वाटेवरची पायपीट 

हिच वाट १०-१५ मिनिटे चालत गेल्यावर एका अशाठिकाणी घेऊन येते जेथे एक पाण्याच्या ओहोळाचा मार्ग लागतो (सारखे दिसणारे काही मार्ग आहेत त्यामुळे पावसाळ्याच्या व त्या नंतरच्या काही दिवसात दाट रान-झाडी उगवल्यामुळे अचूक मार्ग शोधावा लागतो). 




                                                ओहोळाचा मार्गाकडे जाणारी छोटीशी पायवाट 

याच ओहोळाच्या मार्गत उतरावे. सोबत असलेले बहुसंख्य सहयोगींचा हा पहिलाच ट्रेक असलेल्या मुळे या मार्गाने उतरताना प्रत्येकाची निट काळजी घ्यावी लागत होती. 



                                                         हे असं कसरत करीत उतराव लागत



                                                 
                                                 उतरताना लागणारा एक छोटासा अडथळा 

हाच ओहोळाच्या मार्ग पुढे धबदब्याच्या रुपात दरीमध्ये कोसळतो. येथे डावीकडुन एक छोटी वाट खाली उतरते. त्या वाटेने खाली तळाला उतरलो. 
डावीकडून वाहत्या पाण्याच्या उलट्या दिशेने चालल्यावर  १०-१५ मिनिटात आम्ही उल्हास नदीच्या मोठ्या धबदब्यापाशी पोचलो. येथूनच पुढे ही नदी पुढे कर्जत-नेरळ-बदलापूर-उल्हासनगर-भिवंडी असा प्रवास करत पुढे वसईजवळ सागराला मिळते. 
दिवस उन्हाळयाचे होते त्यामुळे आमच्यातील जवळ जवळ सर्वच जण वाहत्या पाण्याखाली मनसोक्त भिजले. 

                                                            नदीवरचा मुख्य धबधबा 



                       किरण कुमार, काजल सोनी, वैभव, कांचन आणि कृतिका मनसोक्त भिजताना 



                     काजल सोनी, वैभव, कांचन, कृतिका, रितेश, मीनाक्षी, वैभव सरोदे आणि विशाल 

मग सपाटून भूक लागली, जेवणाचे डबे खोलले व त्यावर ताव मारला. जवळच असणाऱ्या एका झऱ्याचे पाणी पिण्याकरिता बाटल्यांमध्ये भरून घेतले. आता आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. येथे एका ठिकाणी नदी एका अतिशय चिंचोळ्या जागेमधून वाहते तेथे खाली उतरून पलीकडल्या बाजूला जावे लागते व उजव्या बाजूने अतिशय लहान असलेल्या वाटेने मार्गक्रमण करावे लागते. 



                                  येथून नदीच्या पलीकडल्या दिशेला जाताना थोडी काळजी घ्यावी 

(पावसाळ्यानंतरच्या काही दिवसात येथे फार काळजी घ्यावी). आमच्यातील उमेश ठाकूर, विशाल म्हस्के, प्रतिक म्हात्रे सर्वांची नीट काळजी घेत होते. काहीना तर आम्ही चक्क हाताला धरून पलीकडल्या बाजूला घेऊन गेलो. येथे नदीच्या पत्रामधूनच पुढे चालत जावे लागते. 



                                                येथे नदीच्या पत्रामधूनच पुढे चालत जावे 

पुढे नदीच्या पात्रामधून चालत जाऊन काही वेळात डावीकडल्या वर खंडाळ्याच्या "कामत रिसॉर्ट" कडे वर चढणारी वाट पकडली.
                                                               

या वाटेत २ ठिकाणी लागणाऱ्या सोप्या श्रेणीच्या चढाया करून आम्ही सर्व संध्याकाळी ठीक ६.३० पर्यंत वर चढून आलो. जवळच वाटेमध्ये एके ठिकाणी असलेल्या सरबताच्या गाडीवर मन भेरेस्तोवर सरबत, गोळा, दुध-कोल्ड्रिंक वगैरे पिऊन शुधा पुर्ण केली. तेथून पुढे रिक्षा धरून लोणावळ्यामार्गे मुंबई-पुण्याच्या दिशेने आपापल्या घरी परतलो. 

 "द युथ हायकार्स" करिता छायाचित्रीकरणाची जवाबदारी पार पडल्याबद्दल विशेष आभार : रितेश देसाई 
मोहिमे मध्ये नेहमीप्रमाणे अथक परिश्रम घेणारे माझे स्नेही : उमेश ठाकूर आणि विशाल मस्के.  ट्रेकमध्ये  सहभागार्थी असून  "द युथ हायकार्स" करिती मनापासून परिश्रम घेणारया मयुरेश हिंगे आणि प्रतिक म्हात्रेचा सुद्धा मी मनापासून आभारी आहे. 
तसेच आल्विन, अविष्कार अगरवाल, काजल सोनी, कांचनमाला सिंग, किरण कुमार, कृतिका गंगाधरन, मनिष गोरी, मिनाक्षी चंचलानी, संतोष विपत, विशाखा अगरवाल, स्नेहिल वास, विपुल आहाळे, आनंद पोद्दार, वैभव ढवळे, वैभव सरोदे, शरद गोपट, फक्त १५ वर्षांचा प्रसुक इतर सहभागार्थी मी मनापासून आभारी आहे. 


विशाखा अगरवाल, अवि, वैभव, संतोष, मनीष गोरी आणि कांचन 


काजल, प्रसुक, विपुल, आल्विन, संतोष, अविष्कार, 

                                              
                                              मी, उमेश ठाकूर, प्रतिक म्हात्रे आणि मयुरेश हिंगे



                                                           छायाचित्रकार - रितेश देसाई 
अधिक छायाचीत्रांकारिता करिती फेसबुक लिंक - 
https://www.facebook.com/riteshd1/media_set?set=a.886808808011895.100000483531944&type=3


आपला ऋणी 
द युथ हायकार्स



Friday 9 May 2014

द युथ हायकर्सचा १ दिवसीय पावसाळी ट्रेक - पेबचा किल्ला (विकटगड)


द युथ हायकर्सचा १ दिवसीय पावसाळी ट्रेक - पेबचा किल्ला (विकटगड)

"या रिमझिम झिलमील पाऊसधारा तन-मन फुलवून जाती……. " हि एका  गाण्याची ओळ असो वा "गारवा" सारखी कोणतीही गाणी असोत, ऐकताच चट्कन मन आपणास घेऊन जाते चिंब भिजायला. मग आठवतो पावसाला आणि मनाला ओढ लागते पावसात भिजत एखादा मस्त ट्रेक करण्याची….!!!!

असाच मस्त पावसात भिजत करण्याजोगा एक दिवसीय ट्रेक आम्ही "द यूथ हायकर्स" च्या मध्यमातून घेऊन गेलो होतो "पेबचा किल्ला" अर्थात "विकटगड".


                                                         "पेबचा किल्ला" अर्थात "विकटगड"

इतिहासात वळून पाहता "पेबी" या देवीच्या नावावरुन या गडाला हे नाव पडले असलेल्याचे कळते तर या गडावर पोचणे पूर्वीच्या काळी फारच बिकट होते त्या मुळे या गडाचे विकटगड नाव पडलेल्याची अजून एक माहिती कळून येते. शिवाजी महाराजांच्या काळी मात्र या गडावर असलेल्या गुहांचा उपयोग धान्यांची रसद ठेवण्याचे कोठार म्हणुन होत असलेल्याचा मात्र स्पष्ट उल्लेख सापडतो.

गिरीस्थान माथेरानच्या अगदी लागतच खेटून, उभा असलेला हा डोंगर एका दिवसाच्या भटकंती करिता अतिशय योग्य आहे. किल्ल्यावर चढाई करिता पनवेलच्या दिशेकडून, नेरळकडून, माठेरानहून, शेलूकडून अशा अनेक वाट आहेत, त्यातील सर्वात कमी श्रमाची असलेले वाट माथेरानच्या दिशे कडून आहे.
मध्य रेल्वेच्या नेरळ या स्थानकावर उतरल्यावर माथेरान या गिरीस्थानाच्या रस्त्याला लागावे. (सर्व देशाचे आकर्षण असलेली छोट्याश्या ट्रेनने सुद्धा आपण जाऊ शकतो). या ट्रेन ने गेल्यास वाटेमध्ये लागणाऱ्या "वॉटर गेट" या स्थानकावर उतरून थोडेसे वर यावे अथवा रस्त्याच्या मार्गाने आल्यास या स्थानकाच्या थोड्याश्या वरती असलेल्या जोडमार्गावर उतरावे.


येथून उजवीकडे रेल्वे मार्गासोबत चालून गेल्यावर साधारणतः ४०-४५ मिनिटांनी आपण "कड्यातल्या गणपती" पाशी पोचतो.



                                                             
                                                               "कड्यातल्या गणपती"

येथुन उजवीकडे दरीत एक वाट उतरते. याच वाटेने डोंगराला थोड्या खालच्या बाजुला वळसा घालून २०-२५ मिनिटामध्ये आपण "माथेरान आणि पेब" यांच्या बरोबर मध्यभागावर (खांद्यावर) पोचतो.


                                                      "माथेरानला जाणारा छोटेखानी मार्ग"


                  "आम्ही ७ जण" अखिलेश, विशाल मस्के, मी, हर्षद बुटाला, उत्कर्ष पतंगे, ओंकार शेठ

पुढे त्याच वाटेने डोंगरात बसवलेल्या २ शिड्या चढून १५-२० मिनिटामध्ये आपण पेब वर पोचतो.


                                                        "डोंगरात बसवलेल्या २ शिड्या"

आम्हीहि याच वाटेने पेबला पोचलो. पावसाळ्याचे दिवसात वाट अक्षरशः धुवून निघाली होती, जागोजागी रानझाडी माजली होती.


                                                                "गडावर जाणारा मार्ग"

ती तुडवत, वाटा काढत आम्ही पेब गडावर असलेल्या एका स्वामींच्या समाधी मठात पोचून तेथे चहा-पाणी, वगैरे करून गडाच्या सर्वोच्य माथ्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुका मंदिराकडे निघालो त्यावेळी तुफान पाऊस कोसळत होता. माथ्यावर जाणाऱ्या निसरड्या चिंचोळ्या वाटेने चालणे फारच जोखमीचे झाले होते. प्रचंड धुक्यामध्ये आम्हाला तो माथ्यावर घोंघावणारा जोरदार वारा वर थांबूच देत नव्हता.


                                                          "श्री स्वामी समर्थांचे पादुका मंदिरा"

                                                       
                                                             "श्री स्वामी समर्थांच्या पादुका"

थोडावेळ तेथे थांबून आम्ही परत खाली आलो. आमची पायथ्याच्या गावाकडे उतरायची वाट मात्र आता वेगळी होती. वाटेतील शिडी उतरून पटापट त्या वाटेकडे खालच्या दिशेला निघालो.


                                                          "उतरताना लागणारी एक शिडी"

आमच्या ओळखीतले काही लोक "डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेज" च्या  विद्दार्थी-विद्दार्थीनींनी एक  मोठा गट घेऊन याच वाटेने वर चढणार होते त्यांना वाटेत असणाऱ्या एका छोट्या पण चढण्यास काहीशा कठीण असलेल्या कातळखंडावर चढाईस मदत करण्यासाठी पोचायचे होते.


                                      "डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेज"च्या मोठ्या गटामधील काही


                                        "डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेज"च्या मोठ्या गटामधील काही

गुहांच्या काहीशा पुढे असलेल्या त्या आम्ही पोचून त्यांची वाट पाहत थांबलो.


                                            "डोंगराच्या पोटात मागच्या बाजूला असलेली गुहा"



                                                      "आमच्या सोबतच्या विद्दार्थीनींनी"

थोड्याच वेळात हि मंडळी तिथवर येऊन पोचली. आम्ही त्यांना वर खेचून घेऊ लागलो,


                                                       "आम्ही एक-एक सर्वांना वर खेचून घेतले"

७०-९०-१२०-१४० हा-हा म्हणता त्यांची संख्या वाढतच होती. अखेरीस जवळ-जवळ ३-३ १/२ तासाच्या खडतर मेहनतीमध्ये आम्ही जवळ-जवळ २२५-२५० च्या त्या मोठ्या गटाला वर खेचून घेतले होते. हश्या-हुश्या करत आम्हीही ती वाट उतरून पायथ्याच्या गावात उतरलो. तेथून पुढे रिक्षापकडून नेरळ मार्गे मुंबई-पुण्याच्या दिशेने घरा कडे परतलो.
या ट्रेक बद्दल आम्ही काहीशे भावुक आहोत. कारण "द यूथ हायकर्स" च्या माध्यमातून आयोजित केलेला हा आमचा पहिलाच ट्रेक होता. आज संघाच्या कारकिर्दीत मागे वळून पहिले तर "पेब"चा हा ट्रेक खरोखर अविस्मरणीय आहे.
या ट्रेक मध्ये सहभाग घेऊन मोहीम यशस्वी करण्यात "द युथ हिकेर्स" ला सहकार्य करणाऱ्या विशाल म्हस्के, उमेश ठाकूर, निलेश जैन,  उत्कर्ष पतंगे, हर्षद बुटाला, हितेश पोळ, ओंकार शेठ व इतर  सहकार्यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.


छायाचित्रिकरणाकरिता विशेष आभार "हितेश पोळ"

                                                                       
आपला ऋणी,

द युथ हायकर्स



Thursday 1 May 2014

द युथ हायकार्सची गोरखगडावर रात्रीची चढाई (दिनांक: ४ एप्रिल २०१४, रविवार)

युथ हायकार्सची गोरखगडावर रात्रीची चढाई (दिनांक: एप्रिल २०१४, रविवार)



ट्रेकची माहिती
मुलुख : मुरबाड तालुका
उंची : २१५० फुट (अंदाजे)
पायथ्याचे गाव : देहरी
जिल्हा : ठाणे
ट्रेकची ग्रेड : मध्यम (काताळारोहण)


इतिहास आढावा : गोरखगड हा म्हटला तर तसा किल्ला नाहीच, तो आहे एक सुळका. सह्याद्रीच्या रंगांमध्ये असलेल्या भीमाशंकर रांगाशेजारी असलेल्या सिद्धगडाच्या आगदी शेजारी दोन सरळसोट सुळके उभे आहेत,


                                                     जुळे सुळके -  मच्छिंद्रगड व गोरखगड


 



डावीकडे असलेला "मच्छिंद्रगड" आणि आणि उजवीकडे दिसणारा त्रिकोणी सुळका "गोरखगड".  त्यातील गोरखगड हा नवशिक्या ट्रेकर्सना काताळारोहाणासाठी अतिशय योग्य असा सुळका आहे. "मच्छिंद्रगड" मात्र चढाई-च्या सर्व वाट बंद झाल्यामुळे कसलेल्या कातालारोहाकासाठी आजही एक आव्ह्यान- आहे. मच्छिंद्रगड आणि गोरखगडाच्या मध्ये असलेल्या परिसरामध्ये निबिड जंगल आहे. शहाजी महाराजांच्या कारकीर्दीमध्ये त्या काळी  गोरखगडावर युद्ध झाल्याची काही फारशी नोंद नाही. किल्ला असलेल्याची काही लक्षणे नसलेल्यामुळे बहुदा शेजारी असलेल्या सिद्धगडावर आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्याकरिता आणि पूर्वी असलेल्या नाणेघाटा-मार्गे जुन्नरला जाणाऱ्या   वाटेवर टेहळणीचा बुरुज म्हणून बहुदा या सुळक्याचा उपयोग होत असावा. अजून एक महत्वाचे म्हणजे नाथसाम्प्रदायामधील एक असलेल्या श्री गोरखनाथांचे साधनेचे ठिकाण म्हणून हे स्थान प्रसिद्ध आहे. पायथ्यापासून वर बरीच चढाई करून झाल्यावर एक कातळाच्या पोटामध्ये गुहा आहे. या गुहेमध्ये ४०-५० लोकांची राहण्याची सोय होऊ शकते. जेवणाची सोय मात्र पायथ्याच्या गावामधूनच करावी जगते. या गुहेच्या मागील बाजूला नाथाची कोरलेली मूर्ती असलेले मंदिर आढळले.
                        मुख्य गुहेच्या मागील बाजूला असलेल्या छोट्या  गुहेतील कोरलेल्या मुर्त्या


गुहेच्या बाजूला थंडगार पाण्याचे टाके आहे. येथून पुढे जाणारी वाट कातळात तुटलेल्या पायर्यांच्या मार्गे माथ्यावर घेऊन जाते.
                                           गडाच्या सर्वोच्य टोकावर गोरखनाथांचे छोटेसे देऊळ


गडाच्या सर्वोच्य टोकावर गोरखनाथांचे छोटेसे देऊळ आहेया वाटेवर चढाई करताना सोबत गिर्यारोहणात अनुभवी असलेल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली चढाई करावी. येथून पुढे असलेली वाट तशी म्हटली तर वाट अशी नाहीच, कातला-मधून वर जाणाऱ्या पायऱ्या जागोजागी तुटलेल्या स्वरूपात आहेत. काही ठिकाणी तर चढाई अगदी उभी सरळसोट आहे. टीप - या वाटेवर पावसाळ्यामध्ये चढाई करताना विशेष काळजी घ्यावी.

गिर्यारोहणाचा पुरेसा अनुभय असलेल्या " युथ हायकार्स" च्या माध्यामामधून आम्ही हा ट्रेक आयोजित केला होता. या ट्रेक चे अजून एक खास आकर्षण होते, सहभाग-घेणारे काही परदेसी पाहुणे.
                                                                       परदेसी पाहुणे


त्यामधील काही आणि सहभागघेणाऱ्या इतर काही लोकांसाठी हा त्यांच्या आयुष्यामधील हा पहिलाच ट्रेक होता. आव्ह्यान होते "गोरखगड" आणि त्यातही चढाई होती रात्रीची.                                                            
------------------



ट्रेक ठरवल्या नंतर, काही लोकांनी  या ट्रेकच्या माहितीसाठी मला आणि विशाल म्हस्केला फोन केले होते. तसाच मला एक फोन आला, पलीकडे असणारी व्यक्ती ( मीरेन अरेन्बुरू) परदेशी (स्पेनिश) होती. तिने मला ट्रेक ची जुजबी माहिती विचारली. तिच्यासोबत अजून काही परदेशी लोक ट्रेकला साहाभागी होणार होते. मी उत्कर्ष पतंगे या आमच्या सहायकाला त्या लोकांसोबत आणि अजून काही साहाभागी होणार असलेल्यांना घेऊन ठरलेल्या वेळी घेऊन येण्यास सांगितले.

ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व मिळून १९ जण ट्रेकच्या आदल्या म्हणजे शनिवारी 3 तारखेला रात्री ११.०० पर्यंत कल्याण बस डेपो मध्ये जमा झालो, ११.३० ची अहमदनगर बस पकडून मुरबाड ला उतरलो तेथून पुढे ठरवल्या प्रमाणे जीप वगैरे खासगी वाहनाने मध्यरात्री ०१.०० ला "देहरी" उतरलो.
                                                             कल्याणहून बसचा प्रवास 



गावात आधीच सागीतल्या प्रमाणे चहा, पोहे वगैरे करताना अल्प-परिचयाचा सूचना, वगैरे कार्यक्रम झाला. ठीक .४५ ला आम्ही गोरखगडाची चढाई सुरु केली.
                                                                       
सुरुवातीची दमछाक लागणारी चढाई संपल्यावर तासा-सव्वातासात आम्ही कातळटप्याच्या पायथ्याला पोचलो. येथे काळभैरवाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. तसेच धार्मिक स्थान असलेल्याच्या खुणा आढळून येतात.


                                                                        श्री काळभैरव


खरेपाहता येथून गुहेपर्यंत असलेला कातळटप्पा चढाईसाठी तसा फारसा कठीण नाहीच. परंतु सोबत असलेल्या विशेषता आयुष्यामधला पहिलाच ट्रेक करणाऱ्या काही मंडळींमुळे हि चढाई शिस्तबद्धपणे करावी लागत होती.


                               रात्रीची चढाई

आमच्या मधील विशाल म्हस्के, उमेश ठाकूर, सह्याद्रीतील कातळारोहणासाठी प्रसिद्ध असलेल्या निसर्गमित्र पनवेलचे निखिल पाटील आणि पराग सरोदे हि मंडळी पुढे होती, वाटे मध्ये वेळा दोर लावण्यात आले,




अंधारात कातळटप्प्यात चढाई करताना सर्वांची व्यवस्थित काळजी घेऊन आम्ही वरच्या गुहेत पोचलो तेव्हा पाउने-चार वाजले होते. जवळ-जवळ अडीज तासाच्या मेहनतीने सर्व सहभागी मंडळी दमली होती, म्हणून वर पोचल्या-पोचल्या आम्ही काही मंडळी सोडल्यास बाकीचे सर्वच निद्राधीन झाले.


                                                            सकाळच्या चहा-नाश्ताची तयारी


आम्ही काही लोक पुढील तयारीची चर्चा करीत जागे होतो. सकाळी .३० वाजता हळू-हळू लोक उठू लागली.
 
                                                                             सूर्योदय  


गुहेमधून सूर्योदयाचे विहंगम दृश्य दिसत होते. एकीकडे आमची मंडळी सकाळच्या चहा-नाश्ताची तयारी करत होते. ठीक .३० ला आम्ही सुळक्याच्या टोकावर जाणार्या अंतिम चढाईसाठी निघालो. उमेश ठाकूर आणि विशाल म्हस्के आधी पुढे जाऊन वाटे मध्ये दोर अडकवून आले होते.


                                        सुळक्याच्या अंतिम चढाईच्या टप्प्याची  सुरुवात



वाटे मध्ये असणार्या प्रत्येक कठीण ठिकाणी आमची मंडळी मदतीकरिता उभी होती (काही ठिकाणी उभी चढण आहे).


                                                                       उभी चढण


या वाटेच्या सुरुवातीला असलेली एक छोटी शिडी चढून गेल्यावर मात्र पुढची चढण पाहून आमच्या सोबत आलेल्या काही परदेशी पाहुण्यांची थोडी घाबरगुंडी उडाली होती. इग्नासि कॅपेल्ल बल्ल्बे हा वगळता बाकी सर्व परदेशी मंडळींनी पुढील चढाई करिता असमर्थता दर्शवली.                                                                       
 सर्वोच्य माथ्यावरून स्वतंत्रसेनानी भाई कोतवालांच्या वास्तव्यामुळे परिचित असलेला सिद्धगड, दुर्गम चढाईमुळे कसलेल्या कातालारोहाकासाठी आजही आव्ह्यान असलेला मच्छिंद्रगड, माळशेजचा घाट, जीवधन-नाणेघाटाचा परिसर, भैरवगडाचा परिसर वगैरे दिसतात.



                                                            सिद्धगड आणि भीमाशंकर रांग        


                                                                        मच्छिंद्रगड



                                                     
                                                  

                                                फक्त दोन पाऊले त्या मागे सरळसोट दरी


चढण-उतरणीच्या वटेवर काही ठिकाणच्या कोरीव पायऱ्या जास्त भग्नावस्थेत आहेत, काही ठिकाणच्या वळणावर असलेल्या पायऱ्या सरळसोट तुटलेल्या आहेत त्यामुळे दृष्टीभ्रमामुळे काहीसे भयावह वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. उतरताना वाटेमध्ये दोर सोबतीला होताच पण कातळात कोठे पाय ठेवावा, कोठे हाताला व्यास्थित पकड आहे याची माहिती देण्यासाठी आमची मंडळी जागोजागी उभी होती.

                                                                  नेरिया ओपित्झ

                                                              मुर्तझा इलेक्ट्रिकवाला


                                                                      उभी उतरण


एकमेकांना आधार-सूचना देत आम्ही सर्व मंडळी गुहेत परतलो. थोडासा आराम करून लागलीच पायथ्याच्या "देहरी" गावाच्या वाटेला लागलो, रात्री चढताना लागलेला मार्ग काहींना आता दिवसाच्या उजेडात मात्र काहीसा भयावह वाटत होता.


                                                               एक छोटासा कातळटप्पा

                                               मधुरिमा मयेकर एक कातळटप्पा उतरताना


                                                               अजून एक कातळटप्पा


                                                                 मिरिया घोइकोएत्क्षेअ



मीरेन अरेन्बुरूमी 

लौरा कॅस्तील्लाआणि मागे विशाल म्हस्के

                                                                       जोसू मार्टिनेझ


                                                                       प्रथमेश मोरे
                                                                                                                        

तरीपण सर्वाना आमच्यावर विश्वास होता. आम्ही सर्वांची सुरूवातीपासून चांगली काळजी घेत होतो. त्यामुळे सर्वच निवांतपणे सकाळी ११.३० पर्यंत खालच्या "देहरी" गावात परतलो.


                                                                      परतीची पायपीट


                                                               देहरी गावाच्या दिशेकडे 

सर्वजण श्रमामुळे प्रचंड थकलेले होते. थोड्या वेळच्या विश्रांती नंतर मस्त गावरान सागुती मेजवानीचा झाडून कार्यक्रम झाला.


                                                                  भोजनाचा कार्यक्रम


                                                                          मस्त कैऱ्या



काहींनी शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेतला. मुरबाडसाठी गावातून जाणारी बस दुपारी .३० ला होती. तासभर हाती असल्यामुळे आम्ही जवळच असलेल्या भैरवनाथाच्या मंदिरापाशी जाऊन बसलो. थोडा वेळ कबड्डीचा खेळ रंगला, परदेशी पाहुण्यांसाठी हा नवीन प्रकार होता, तरी पण त्यांनीसुद्धा आपल्या अस्सल देशी खेळाचा आनंद घेतला. 

                             कब्बड्डीचा डाव 

पाहुण्यांनी आमच्या मंडळींसोबत फोटो काढून घेतले.

                                                 पराग सरोदे आणि मिरिया घोइकोएत्क्षेअ


                                                   निखिल पाटील आणि मीरेन अरेन्बुरूमी


                                 उत्कर्ष पतंगे, निलेश जैन, विशाल म्हस्के आणि इग्नासि कॅपेल्ल

थोड्यावेळाने आम्ही .३० ची मुरबाड बस तेथून पुढची कल्याण बस पकडून आम्ही ठरलेल्या वेळेला दुपारी ०३.३० ला कल्याणला पोहचलो ठरवल्या प्रमाणे ट्रेकची सांगता केली

----------

गोरखगड ट्रेक मध्ये सहभाग घेऊन मोहीम यशस्वी करण्यात " युथ हायकार्स" ला सहकार्य करणाऱ्या विशाल म्हस्के, उमेश ठाकूर, निलेश जैनउत्कर्ष पतंगे या माझ्या सहकार्यांचा आणि इतर सहभागार्थी प्रथमेश मोरेपराग सरोदेनिखिल पाटीलमधुरिमा मयेकर, आनंद पोद्दार, मुर्तझा इलेक्ट्रिकवाला, प्रशांत लांडगे, प्रसाद पांढरे आणि इग्नासि कॅपेल्ल, लौरा कॅस्तील्ला, मिरिया घोइकोएत्क्षेअ, जोसू मार्टिनेझ, नेरिया ओपित्झ आणि मीरेन अरेन्बुरूमी या परदेशी पाहुण्याचा मनःपूर्वक आभारी आहे.
हि मंडळी परत मागे फिरली, इग्नासिला मात्र आमच्या सोबत घेऊन मध्यमश्रेणी असलेलेली चढाई करून आम्ही बाकीचे माथ्यावर पोचलो. माथ्यावर पोचल्यावर मिळणाऱ्या आनंदाची खरी मजा काही औरच. कसलेल्या डोंगरयात्रींसाठी ते खरे स्वर्गसुखच असते.

                                                                          ग्रुप फोटो


"
युथ हायकार्स" करिता छायाचित्रीकरणाची जवाबदारी पार पडल्याबद्दल विशेष आभार : मुर्तझा इलेक्ट्रिकवाला
   
                                                              मुर्तझा इलेक्ट्रिकवाला


आपला ऋणी,
युथ हायकार्स