Friday 9 May 2014

द युथ हायकर्सचा १ दिवसीय पावसाळी ट्रेक - पेबचा किल्ला (विकटगड)


द युथ हायकर्सचा १ दिवसीय पावसाळी ट्रेक - पेबचा किल्ला (विकटगड)

"या रिमझिम झिलमील पाऊसधारा तन-मन फुलवून जाती……. " हि एका  गाण्याची ओळ असो वा "गारवा" सारखी कोणतीही गाणी असोत, ऐकताच चट्कन मन आपणास घेऊन जाते चिंब भिजायला. मग आठवतो पावसाला आणि मनाला ओढ लागते पावसात भिजत एखादा मस्त ट्रेक करण्याची….!!!!

असाच मस्त पावसात भिजत करण्याजोगा एक दिवसीय ट्रेक आम्ही "द यूथ हायकर्स" च्या मध्यमातून घेऊन गेलो होतो "पेबचा किल्ला" अर्थात "विकटगड".


                                                         "पेबचा किल्ला" अर्थात "विकटगड"

इतिहासात वळून पाहता "पेबी" या देवीच्या नावावरुन या गडाला हे नाव पडले असलेल्याचे कळते तर या गडावर पोचणे पूर्वीच्या काळी फारच बिकट होते त्या मुळे या गडाचे विकटगड नाव पडलेल्याची अजून एक माहिती कळून येते. शिवाजी महाराजांच्या काळी मात्र या गडावर असलेल्या गुहांचा उपयोग धान्यांची रसद ठेवण्याचे कोठार म्हणुन होत असलेल्याचा मात्र स्पष्ट उल्लेख सापडतो.

गिरीस्थान माथेरानच्या अगदी लागतच खेटून, उभा असलेला हा डोंगर एका दिवसाच्या भटकंती करिता अतिशय योग्य आहे. किल्ल्यावर चढाई करिता पनवेलच्या दिशेकडून, नेरळकडून, माठेरानहून, शेलूकडून अशा अनेक वाट आहेत, त्यातील सर्वात कमी श्रमाची असलेले वाट माथेरानच्या दिशे कडून आहे.
मध्य रेल्वेच्या नेरळ या स्थानकावर उतरल्यावर माथेरान या गिरीस्थानाच्या रस्त्याला लागावे. (सर्व देशाचे आकर्षण असलेली छोट्याश्या ट्रेनने सुद्धा आपण जाऊ शकतो). या ट्रेन ने गेल्यास वाटेमध्ये लागणाऱ्या "वॉटर गेट" या स्थानकावर उतरून थोडेसे वर यावे अथवा रस्त्याच्या मार्गाने आल्यास या स्थानकाच्या थोड्याश्या वरती असलेल्या जोडमार्गावर उतरावे.


येथून उजवीकडे रेल्वे मार्गासोबत चालून गेल्यावर साधारणतः ४०-४५ मिनिटांनी आपण "कड्यातल्या गणपती" पाशी पोचतो.



                                                             
                                                               "कड्यातल्या गणपती"

येथुन उजवीकडे दरीत एक वाट उतरते. याच वाटेने डोंगराला थोड्या खालच्या बाजुला वळसा घालून २०-२५ मिनिटामध्ये आपण "माथेरान आणि पेब" यांच्या बरोबर मध्यभागावर (खांद्यावर) पोचतो.


                                                      "माथेरानला जाणारा छोटेखानी मार्ग"


                  "आम्ही ७ जण" अखिलेश, विशाल मस्के, मी, हर्षद बुटाला, उत्कर्ष पतंगे, ओंकार शेठ

पुढे त्याच वाटेने डोंगरात बसवलेल्या २ शिड्या चढून १५-२० मिनिटामध्ये आपण पेब वर पोचतो.


                                                        "डोंगरात बसवलेल्या २ शिड्या"

आम्हीहि याच वाटेने पेबला पोचलो. पावसाळ्याचे दिवसात वाट अक्षरशः धुवून निघाली होती, जागोजागी रानझाडी माजली होती.


                                                                "गडावर जाणारा मार्ग"

ती तुडवत, वाटा काढत आम्ही पेब गडावर असलेल्या एका स्वामींच्या समाधी मठात पोचून तेथे चहा-पाणी, वगैरे करून गडाच्या सर्वोच्य माथ्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थांच्या पादुका मंदिराकडे निघालो त्यावेळी तुफान पाऊस कोसळत होता. माथ्यावर जाणाऱ्या निसरड्या चिंचोळ्या वाटेने चालणे फारच जोखमीचे झाले होते. प्रचंड धुक्यामध्ये आम्हाला तो माथ्यावर घोंघावणारा जोरदार वारा वर थांबूच देत नव्हता.


                                                          "श्री स्वामी समर्थांचे पादुका मंदिरा"

                                                       
                                                             "श्री स्वामी समर्थांच्या पादुका"

थोडावेळ तेथे थांबून आम्ही परत खाली आलो. आमची पायथ्याच्या गावाकडे उतरायची वाट मात्र आता वेगळी होती. वाटेतील शिडी उतरून पटापट त्या वाटेकडे खालच्या दिशेला निघालो.


                                                          "उतरताना लागणारी एक शिडी"

आमच्या ओळखीतले काही लोक "डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेज" च्या  विद्दार्थी-विद्दार्थीनींनी एक  मोठा गट घेऊन याच वाटेने वर चढणार होते त्यांना वाटेत असणाऱ्या एका छोट्या पण चढण्यास काहीशा कठीण असलेल्या कातळखंडावर चढाईस मदत करण्यासाठी पोचायचे होते.


                                      "डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेज"च्या मोठ्या गटामधील काही


                                        "डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेज"च्या मोठ्या गटामधील काही

गुहांच्या काहीशा पुढे असलेल्या त्या आम्ही पोचून त्यांची वाट पाहत थांबलो.


                                            "डोंगराच्या पोटात मागच्या बाजूला असलेली गुहा"



                                                      "आमच्या सोबतच्या विद्दार्थीनींनी"

थोड्याच वेळात हि मंडळी तिथवर येऊन पोचली. आम्ही त्यांना वर खेचून घेऊ लागलो,


                                                       "आम्ही एक-एक सर्वांना वर खेचून घेतले"

७०-९०-१२०-१४० हा-हा म्हणता त्यांची संख्या वाढतच होती. अखेरीस जवळ-जवळ ३-३ १/२ तासाच्या खडतर मेहनतीमध्ये आम्ही जवळ-जवळ २२५-२५० च्या त्या मोठ्या गटाला वर खेचून घेतले होते. हश्या-हुश्या करत आम्हीही ती वाट उतरून पायथ्याच्या गावात उतरलो. तेथून पुढे रिक्षापकडून नेरळ मार्गे मुंबई-पुण्याच्या दिशेने घरा कडे परतलो.
या ट्रेक बद्दल आम्ही काहीशे भावुक आहोत. कारण "द यूथ हायकर्स" च्या माध्यमातून आयोजित केलेला हा आमचा पहिलाच ट्रेक होता. आज संघाच्या कारकिर्दीत मागे वळून पहिले तर "पेब"चा हा ट्रेक खरोखर अविस्मरणीय आहे.
या ट्रेक मध्ये सहभाग घेऊन मोहीम यशस्वी करण्यात "द युथ हिकेर्स" ला सहकार्य करणाऱ्या विशाल म्हस्के, उमेश ठाकूर, निलेश जैन,  उत्कर्ष पतंगे, हर्षद बुटाला, हितेश पोळ, ओंकार शेठ व इतर  सहकार्यांचा मी मनःपूर्वक आभारी आहे.


छायाचित्रिकरणाकरिता विशेष आभार "हितेश पोळ"

                                                                       
आपला ऋणी,

द युथ हायकर्स



No comments:

Post a Comment